2 किलो 700 ग्रामचं गोल्डन घबाड हवाईमार्गे आलं मुंबईत आणि तरन्नुम खान, विशाल ओबेरॉय गेले थेट जेलमध्ये

अनिश पाटील
Saturday, 23 January 2021

दोनही प्रवासी दुबईवरून मुंबईत आले होते. तरन्नुम खान आणि विशाल ओबेरॉय अशी अटक करण्यात आलेल्या दोन प्रवाशांची नावे आहेत.

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 2700 ग्रॅम सोन्यासह दोन प्रवाशांना सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने अटक केली. त्यात एका महिलेचा समावेश आहे. प्रवाशांकडून जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत सव्वा कोटी रुपये आहे.

महत्त्वाची बातमी : मुंबईची हवा पडली 'आजारी'; कशामुळे होतेय मुंबईची हवा इतकी विषारी ?

दोनही प्रवासी दुबईवरून मुंबईत आले होते. तरन्नुम खान आणि विशाल ओबेरॉय अशी अटक करण्यात आलेल्या दोन प्रवाशांची नावे आहेत. ओबेरॉय हा सायन कोळीवाडा येथील रहिवासी असून त्याच्याकडे मॉरिशिअस देशाचा पासपोर्ट. 

महत्त्वाची बातमी : मुंबईकरांनो सावधान ! तुम्ही पिताय ते दुध भेसळयुक्त तर नाही ना?

दोघांकडून पांढरी कोटींग असलेले 2700 ग्रॅम क्रुड सोने सापडले आहे. त्यांची किंमत एक कोटी 18 लाख रुपये आहे. या प्रवाशांनी बॅगेमध्ये सोने लपवले होते. दोघेही एकमेकांच्या परिचयाचे आहेत. या प्रकरणात दोघांनाही न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून आरोपींच्या मागे एखादी टोळी कार्यरत आहे का, याबाबत पोलिस तपास करत आहेत.

मुंबई आणि आसपासच्या परिसरातील सर्व बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

mumbai crime news two detained for illegally bringing gold about 2 kg 700 grams


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai crime news two detained for illegally bringing gold about 2 kg 700 grams