Mumbai : अंधेरी हॉटेल मालक अपहरण प्रकरण; 7आरोपी अटकेत..हॉटेल मालकाची सुटका

मुंबईच्या अंधेरी-कुर्ला रोडवर वीरा रेसिडेन्सी नावाचे हॉटेल अनुप शेट्टी यांच्या मालकीचे आहे. यात विजय ओखीरकर नामक व्यक्ती त्यांचा व्यावसायिक भागीदार म्हणून होता. मात्र भागीदारीत वाद निर्माण झाल्यामुळे विजय ओखीरकर याने आपले अडीच लाख रुपये शेट्टी यांच्याकडे मागितले.
Crime
Crimeesakal

मुंबई - मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरात गोळीबार करत हॉटेल व्यवसायिकाचे अपहरण झाल्याची घटना सोमवारी 24 एप्रिलला दुपारी घडली होती. या घटनेच्या 13 तासांच्या आत पोलिसांनी अपहरणकर्त्यांच्या तावडीतून हॉटेल व्यवसायिकाची सुखरुप सुटका केली.

अनुप शेट्टी असे या हॉटेल व्यवसायिकाचे नाव असून पोलिसांनी ठाणे जिल्ह्याच्या शहापूर येथून त्याची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सूटका केली आहे.या प्रकरणी पोलिसांनी 7 अपहरणकर्त्याना अटक केली आहे. व्यावसायिक भागीदारीतून हा सर्व प्रकार झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

भागीदाराच्या वादातून अपहरण

मुंबईच्या अंधेरी-कुर्ला रोडवर वीरा रेसिडेन्सी नावाचे हॉटेल अनुप शेट्टी यांच्या मालकीचे आहे. यात विजय ओखीरकर नामक व्यक्ती त्यांचा व्यावसायिक भागीदार म्हणून होता. मात्र भागीदारीत वाद निर्माण झाल्यामुळे विजय ओखीरकर याने आपले अडीच लाख रुपये शेट्टी यांच्याकडे मागितले.

Crime
Mumbai : न्यायालयाच्या आदेशानंतर आरेतील १७७ झाडांवर कुऱ्हाड

मात्र अनुप शेट्टी हे पैसे देण्यास टाळाटाळ करत होते. या रागातून सोमवारी 24 एप्रिल दुपारी 3 वाजता हॉटेल वीरा रेसिडेन्सी हॉटेलजवळ अनुप शेट्टी यांच्यावर गोळीबार करुन त्यांना धमकावत इनोव्हा गाडीत जबरदस्तीने टाकून सात जणांनी त्यांच्या अपहरण केले.

शहापुरहून सुटका...

अंधेरीतील एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपासासाठी एकूण बारा पथके तयार करुन अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केला.अपहरणकर्ते ठाण्यातील शहापूरच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

नंतर शहापूरच्या दिशेने पोलिसांची पथके रवाना झाली. अपहरणकर्ते शहापूर परिसरात असल्याचे समजताच पोलिसांनी शहापूर भागातील रस्त्यावर वाहने आडवी लावून अपहरणकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी फिल्मी स्टाईलमध्ये पोलिसांच्या गाड्या आपल्या गाडीने उडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आपल्या जवळील बंदुका काढून अपहरणकर्त्यांवर रोखल्यानंतर आरोपी पोलिसांना शरण आले आणि अपहृत हॉटेल व्यवसायिकाची सुखरुप सुटका केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com