Mumbai Crime : भायखळ्यात तीन लहान बहिणींवर लैंगिक अत्याचार; 42 वर्षीय शेजारी अटकेत

मुंबईतून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. 42 वर्षीय शेजाऱ्याने केले तीन चिमुरड्या बहिणींवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
crime
crimeesakal
Summary

मुंबईतून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. 42 वर्षीय शेजाऱ्याने केले तीन चिमुरड्या बहिणींवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मुंबई - मुंबईतून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. 42 वर्षीय शेजाऱ्याने केले तीन चिमुरड्या बहिणींवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सर जे जे मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंद करत आरोपीला अटक केली आहे. भायखळा परिसरातील हा धक्कादायक प्रकार आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 42 वर्षीय शेजाऱ्याने खाऊ द्यायच्या बहण्याने तीन चिमुरड्या बहिणींवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुंबईच्या भायखळा परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. शेजाऱ्याच्या कृत्याने परिसरातील नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

काय घडले

मुंबईच्या भायखळा परिसरात राहणाऱ्या तीन चिमुरड्या मुलींना 42 वर्षीय शेजारील व्यक्तीने त्यांना नुडल्स खाउ घालण्याच्या निमित्ताने घरी बोलावले. या शेजाऱ्याने घरी बोलावून तिन्ही चिमुरड्या मुलींचे शारीरिक शोषण केले.

त्यानंतर या मुलींनी घरातून तातडीने घरातून पळ काढला. त्यानंतर या तिघींनी त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग आईला सांगितला. पीडित मुलींच्या आईने सर जे जे मार्ग पोलिसांत धाव घेऊन आरोपीविरोधात तक्रार दिली. या प्रकरणी सर जे जे मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. या आरोपीला अत्याचार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत अटक केली आहे. भायखळा परिसरातील धक्कादायक प्रकारने एकच खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com