Mumbai Crime: चोरीतील रेकॉर्डवरील आरोपीसह दोघांना अटक

Andheri Crime: शाळेच्या बांधकामासाठी आणलेल्या सळ्या चोरल्याचा आरोप
Mumbai Crime: चोरीतील रेकॉर्डवरील आरोपीसह दोघांना अटक

Andheri Crime: चोरीच्या गुन्ह्यातील एका रेकॉर्डवरील आरोपीसह दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. शाहनवाज मोहम्मद शफीक मोमीन आणि मोहम्मद युसूफ मोहम्मद शमशेर चौधरी अशी या दोघांची नावे आहे. या दोघांवर गोवंडीतील एका शाळेच्या बांधकामासाठी आणलेल्या लोखंडी सळ्यांची चोरी केल्याचा आरोप असून दोघेही सध्या पोलिस कोठडीत आहेत.

गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात एका शाळेच्या बांधकामासाठी काही साहित्य आणून ठेवण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी काहीजण तिथे ठेवलेल्या लोखंडी सळ्या चोरी करत असताना काही कामगारांच्या लक्षात आले होते. त्यामुळे या कामगारांनी दोघांना पकडून शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. चौकशीदरम्यान या दोघांची नावे शाहनवाज मोमीन आणि मोहम्मद युसूफ चौधरी असल्याचे उघडकीस आले. ते दोघेही गोवंडीतील रहिवासी असून यातील शाहनवाज हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

त्याच्याविरुद्ध चोरी, जबरी चोरी, शिवीगाळ करून धमकी देणे, गंभीर दुखापत करणे आदी पाचहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांनी लोखंडी सळ्या चोरी करून भंगारात विक्री केल्याची कबुली दिली आहे. स्थानिक न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com