esakal | मुंबई : निनावी कॉलप्रकरणी एकाला अटक | Mumbai crime
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai crime

मुंबई : निनावी कॉलप्रकरणी एकाला अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंधेरी : विमानतळ कर्मचाऱ्यांच्या (Airport employee) जीवाला धोका असल्याचा निनावी कॉल (unknown call) करून दहशतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी ( crime activity) मोहम्मद इलियास (वय ३८) याला सहार पोलिसांनी (sahar police) अटक केली. तो मूळचा उत्तर प्रदेशचा (uttar pradesh) रहिवाशी आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक वही आणि मोबाईल जप्त केले. त्यात काही नामांकित मल्टिनॅशनल कंपनीचे क्रमांक (multinational company number) पोलिसांना सापडले आहेत. मोहम्मद इलियासने अशाप्रकारे इतर काही कंपन्यांमध्ये कॉल केले आहेत का, याचा आता पोलीस तपास करीत आहेत. वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

हेही वाचा: कल्याण : हातभट्टीवरील 300 लिटर गावठी दारू जप्त; एकाला अटक

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर काम करणाऱ्या एकोणीस कर्मचाऱ्यां‍च्या जीवाला धोका असल्याचा एक कॉल मंगळवारी (ता. २८) मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला आला होता. या कॉलनंतर स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा, एटीएस आणि बॉम्बशोधक व नाशक पथकाने श्‍वान पथकासह घटनास्थळी धाव घेतली. संपूर्ण विमानतळाची तपासणी केल्यानंतर ती अफवा असल्याचे उघडकीस आले. या घटनेनंतर अज्ञाताविरुद्ध सहार पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. पोलिसांना तो कॉल उत्तर प्रदेशातून आल्याचे समजले. त्यानंतर पथकाने दोन दिवसांपूर्वी मोहम्मद इलियासला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. त्यानेच हा कॉल केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

loading image
go to top