मुंबईत कोरोना रुग्णसंख्या 50 हजार पार; जाणून घ्या आजची आकडेवारी.. 

corona
corona

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. आज राज्यात कोरोना रुग्णांनी तब्बल 90 हजारांचा टप्पा ओलांडला आहे तर मुंबईतही कोरोना रुग्णांचा आकडा 50 हजारांच्या पार पोहोचला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता अधिकच वाढली आहे.   

मुंबईतील कोरोना रुग्णवाढ सुरूच असून रुग्णांचा आकडा हजाराच्या खाली येताना दिसत नाही . आज ही मुंबईतील बाधित रुग्णांच्या संख्येत 1,015 नवीन रुग्णांची भर पडली असून  एकूण रुग्णसंख्येने 50 हजारांचा आकडा पार केला आहे. आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 50, 878 झाली आहे. तर आज 58 जणांचा मृत्यू झाला असून  मृतांचा एकूण आकडा 1758 वर पोहोचला आहे.        

मुंबईत आज नोंद झालेल्या 58 मृत्यूंपैकी 47 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 40 पुरुष तर 18 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी दोघांचे वय 40 च्या खाली होते. तर 30 रुग्ण 60 वर्षा वरील होते तर  26 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.       

संशयित रुग्णांमध्ये ही वाढ झाली असून आज एकूण 690 नवे संशयित रुग्ण सापडले असून  आतापर्यंत 37,703 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 904 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत  22,942 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. 
mumbai crosses 50 thousand mark of corona patients

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com