Dahihandi Festival : रिमझिम पावसात कुठे चहाचा ताजेपणा, तर कुठे मद्याची नशा!

दहिहंडी उत्सवात मद्यविक्री सुसाट!
Wine Selling
Wine SellingSakal

मुंबई - मुंबई उपनगरता भर पावसात दहीहंडी उत्सव पार पडला. मात्र, गुरुवारी शहरातील मद्यविक्री केंद्रावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी उसळली होती. भर पावसात भिजलेल्या तरुणाना ताजेपणासाठी चहा टपरीवर धाव घेतली. तर काहीहानी मद्याचा दुकानाकडे धावत घेतलं असल्याचे चित्र दिसून आले.

मुंबई, ठाणे, कल्याण डोबिवली, बोरिवलीसह संपूर्ण महामुंबईत दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची खास चमक सर्वत्र पाहायला मिळते. विशेष म्हणजे, दांडी मारलेल्या पावसाने गुरुवारी मुंबई उपनगरत जोरदार हजेरी लावली. सतत कोसळणाऱ्या पावसामध्ये दहीहंडी उत्सवात तरुणामध्ये जल्लोष बघल्याला मिळाला.

विशेष म्हणजे उकाळल्याने हैराण झालेल्या मुंबईकर पावसाने सुखावले होते. विशेष म्हणजे दहीहंडी फोडायला जाणाऱ्या पथकांतील तरुण पावसात भिजल्याने ताजेपणा येण्यासाठी काहींनी चहा टपरी धावत घेत होते. तर काही मद्याचा दुकानात गर्दी केल्याचे दिसून आले होते. त्यामुळे गुरुवारी शहरातील मद्यविक्री करणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

बारमध्ये ही गर्दी -

दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे अनेकांनी बारमध्ये मद्य पिण्याचा बेत आखला होता, त्यामुळे मुंबई आणि उपनगरातील बारमध्ये सुद्धा तळीरामाची मोठी गर्दी दिसून आली, विशेष दहिहंडी बघालायला कुटूंबीय घेऊन बाहेर पडलेल्या नागरिकांनी फॅमिली बार रेस्टोरंटमध्ये गर्दीचे चित्र दिसून आले, अनेक ठिकाणी ग्राकाना नंबर येण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com