मुंबई : दलित चळवळीतील ‘चंद्रूं’चा शुक्रवारी सन्मान! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबई : दलित चळवळीतील ‘चंद्रूं’चा शुक्रवारी सन्मान !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : संविधान दिना निमीत्त दलित चळवळीतील ‘चंद्रूं’चा सन्मान घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर तर्फे करण्यात येणार आहे.सध्याकाळी 5 वाजता हा सोहळा होणार असून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मालिकेत वडील सुभेदार रामजी आंबेडकर यांची भूमिका साकारलेले अभिनेते मिलिंद अधिकारी यांच्या हस्ते शोषितांचे खटले मोफत लढणाऱ्या वकिलांना गौरवण्यात येणार आहे. यावेळी अ‍ॅड. कीर्ति ढोले, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ हे अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

गौरविण्यात येणाºया वकिलांमध्ये अ‍ॅड.किरण चन्ने, अ‍ॅड. आशाताई लांडगे, अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे, अ‍ॅड. अँजेलिना ढोले, अ‍ॅड.राजेश करमरकर, अ‍ॅड. सिद्धांत सरवदे, अ‍ॅड. अनिल वाघमारे, अ‍ॅड. अनार्या हिवराळे, अ‍ॅड.अमित कटारनवरे, अ‍ॅड. संतोष कोकाटे, अ‍ॅड. जितेन तुपे, अ‍ॅड. जीवन लोंढे, अ‍ॅड. हर्षू साळवे, अ‍ॅड. मिलिंद गायकवाड, अ‍ॅड. मिलिंद पाखरे, अ‍ॅड. निलेश गरूड, अ‍ॅड. रोहित गांगुर्डे, अ‍ॅड. केसरीमल भोईर आदींचा समावेश आहे. या सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रांतील काही समर्पित नामवंताचाही प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. त्यात प्रख्यात क्षयरोग चिकित्सक डॉ. राजेंद्र ननावरे, डॉ. राजेंद्र जयस्वाल, शाहीर संभाजी भगत, शाहीर प्रसाद आंतरवेलीकर यांचाही गौरव करण्यात येणार आहे. संविधान गौरव समितीच्या एका बैठकीनंतर निमंत्रक डॉ. हरीष आहिरे यांनी एका पत्रकादारे आज केली.

हेही वाचा: Corona: दिवसभरात 5,508 नवे रुग्ण, टास्क फोर्सच्या बैठकीनंतर निर्बंध होणार शिथिल

पँथर नेत्यांच्या सहचारिणींचाही सत्कार

या संविधान दिन समारंभात दिवंगत लढाऊ पँथर नेत्यांच्या सहचारिणींचाही सत्कार करण्याचा निर्णय संविधान गौरव समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार दीक्षा राजा ढाले, मल्लिका नामदेव ढसाळ, सुषमा भाई संगारे, उषाताई बाबूराव शेजवळ, शशिकला मनोहर जाधव यांना महावस्त्र आणि सन्मान निधी प्रदान करून गौरवण्यात येणार आहे.

loading image
go to top