दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला रुग्णालयातून डिस्चार्ज

वॉन्टेड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला मंगळवारी 23 ऑगस्टला दुपारी 5 वाजता जे जे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Iqbal Kaskar
Iqbal Kaskarsakal
Summary

वॉन्टेड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला मंगळवारी 23 ऑगस्टला दुपारी 5 वाजता जे जे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबई - वॉन्टेड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला मंगळवारी 23 ऑगस्टला दुपारी 5 वाजता जे जे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जे जे रुग्णालयातून इकबाल कासकरला पुन्हा तळोजा कारागृहात पाठवण्यात आले आहे. छातीत दुखत असल्याने त्याला 21 ऑगस्टला रविवारी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले नवी मुंबई येथील तळोजा जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या इकबालने शनिवारी रात्री छातीत दुखत असल्याची तक्रार केली. यानंतर जेल प्रशासनाने इकबाल कासकर याला मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

इकबाल कासकर याला ईडीने आर्थिक अफरातफर प्रकरणात अटक केली आहे. याआधी ठाणे पोलिसांच्या एका टीमने प्रदीप शर्मा यांच्या नेतृत्वात इकबाल कासकर याला सप्टेंबर २०१७ मध्ये अटक केली होती. इकबालवर एका विकासकाकडे खंडणीची मागणी केल्याचा आरोप होता. नंतर झालेल्या तपासात इकबाल कासकर याच्यावर तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये खंडणीची मागणी केल्याचा आरोप ठेवण्यात आला. तळोजा जेलमध्ये असलेल्या इकबाल कासकर याला ईडीने आर्थिक अफरातफर प्रकरणात जून 2021 मध्ये ताब्यात घेतले. सध्या आर्थिक अफरातफर प्रकरणात इकबाल कासकर न्यायालयीन कोठडीत तळोजा जेलमध्ये आहे.

आतापर्यंतचा तपास

1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिम आणि इतरांविरुद्ध एनआयएने फेब्रुवारी 2022 नोंदवला होता. ईडीने मुंबईतील दाऊद इब्राहिमशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापे टाकले होते. मनी लाँड्रिंग प्रकरणात हे छापे टाकण्यात आले होते. यामध्ये दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरसह अनेक नातेवाईक आणि जवळच्या सहकार्याच्या ठिकाण्यांवरही छापे टाकण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, इक्बाल कासकर दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांचा वापर करून खंडण्या उकळायचा. इक्बाल कासकर हा डी गँगचा खास सदस्य असून, धमक्या देणे, खंडणी वसूल करणे अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com