esakal | मुंबई : पत्नीचे अश्‍लील व्हिडीओ पाठवून पैशांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

विवाहितेचे अश्‍लील छायाचित्र व्हायरल करणाऱ्यास अटक

मुंबई : पत्नीचे अश्‍लील व्हिडीओ पाठवून पैशांची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गोवंडी येथे राहणार्‍या एका महिलेचे अश्‍लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला, तिच्याकडून खंडणी वसुल केल्यानंतर ते फोटो आणि व्हिडीओ तिच्या पतीला पाठविले, ते व्हिडीओ पिडीत महिलेच्या पतीने तिच्या कुटुंबियांना पाठवून तलाक देण्याची मागणी करुन तिचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याच गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या आरोपी पतीला अखेर उत्तर प्रदेशातून देवनार पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. यापूर्वी पिडीत महिलेचा प्रियकराला पोलिसांनी अटक केली होती. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम आगवणे यांनी दुजोरा दिला आहे. पिडीत २७ वर्षांची महिला गोवंडी परिसरात राहते.

हेही वाचा: परंपरेची नग्नता; पावसासाठी अल्पवयीन मुलीचा छळ!

तिचे नईमउद्दीन (नावात बदल) या तरुणासोबत विवाह झाला होता. तिचे त्याच परिसरात राहणार्‍या गुलाम नावाच्या एका तरुणाने तिचे काही अश्‍लील फोटो काढले होते. ते फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार करीत होता. त्यांच्यातील शारीरिक संबंधाचे त्याने काही अश्‍लील व्हिडीओ काढले होते. तेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिला सतत धमकी देत होता. तसेच तिच्याकडे पैशांची मागणी करीत होता. बदनामीच्या भीतीने तिने गुलामला पाच लाख वीस हजार रुपये दिले होते. त्यानंतर त्याने तिचे अश्‍लील फोटो आणि व्हिडीओ तिच्या पतीला पाठविले होते. त्याने तिच्या पतीने तिचे व्हिडीओ तिच्या कुटुंबियांना पाठवून त्यांच्याकडे तलाक देण्याची मागणी केली.

हेही वाचा: औसा तालुक्यात पैशासाठी विवाहितेचा छळ; पती विरोधात गुन्हा दाखल

तलाक दिला नाहीतर तिचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. या प्रकारामुळे पिडीत महिला प्रचंड मानसिक तणावात होती. अखेर तिने पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. तिने देवनार पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिच्या प्रियकरासह पतीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम आगवणे यांनी गंभीर दखल घेत तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी या दोघांविरुद्ध लैगिंक अत्याचारासह मारहाण करणे, खंडणी आणि धमकी देणे तसेच आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.

गुन्हा दाखल होताच आरोपी गुलामला पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यांत तिच्या पतीला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते. तो उत्तर प्रदेशातील त्याच्या गावी असल्याची माहिती प्राप्त होताच देवनार पोलिसांचे एक विशेष पथक तिथे रवाना झाले होते. या पथकाने आरोपी पतीला त्याच्या श्रावस्ती, गिलोली तालुक्यातील गावातून अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

loading image
go to top