esakal | मुंबई : चाळी आणि उच्चभ्रु वस्तीत डेंगीचा कहर
sakal

बोलून बातमी शोधा

डेंगीचा डास

मुंबई : चाळी आणि उच्चभ्रु वस्तीत डेंगीचा कहर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : डेंगीचा कहर चाळी आणि उच्चभ्रु वस्तीत वाढला असून बी सॅन्डहर्ट रोड, एफ दक्षिण लालबाग परळ, एच पश्चिम वांद्रे खार पश्चिम या तीन परिसरांमध्ये डेंग्यू फोफावला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पावसाला पुन्हा मुंबईत सुरूवात झाली असून पावसाळी आजारांमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. एकट्या ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे 132 रुग्ण सापडले असून आतापर्यंत एकूण 209 रुग्णांची नोंद झाली आहे.  सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण एफ दक्षिण, बी आणि एच पश्चिम या वॉर्ड मधून आढळले असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

मलेरियाचा ही वाढता धोका -

दरम्यान, मुंबईत मलेरियाचा ही वाढता धोका असून जानेवारी ते ऑगस्ट 3,338 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

तर, ऑगस्ट महिन्यात 790 मलेरियाचे रूग्ण आढळून आले आहेत. मलेरियासह गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टच्या विकारांनीही रुग्ण त्रासले आहेत. आठ महिन्यांत 1848 गॅस्ट्रोचे रुग्णांची नोंद झाली आहे.

हेही वाचा: जनतेकडून पैसा काढून खास लोकांना दिला जातोय - राहुल गांधी

पावसाळी आजारांपासून लहानग्यांचे संरक्षण करा  -

तापमानात अचानक झालेली घट, हवेतील आर्द्रता आणि पावसानंतर साचलेले पाणी, थंड हवा, दुषित पाण्यामुळे आणि डासांपासून होणारे आजार उद्भवत असून यामुळे सर्वच वयोगटातील मुले साथीच्या आजारांना बळी पडतात. वेळीच या आजारांवर उपचार करणे आवश्यक असून त्वरीत बालरोगतज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.

डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया हे ताप, स्नायुंमधील तीव्र वेदना, पुरळ, उलट्या आणि ओटीपोटात दुखण्याशी संबंधित आहेत. याकरिता पुरेसे द्रव पदार्थांचे सेवन आणि विश्रांतीची आवश्यकता आहे. ओटीपोटात दुखणे, सतत उलट्या होणे, रक्तस्त्राव होणे यासारख्या गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे,  असा सल्ला बालरोग तज्ञ डॉ प्रशांत मोरलवार यांनीदिला आहे.

दूषित अन्न आणि पाण्यामुळे टायफॉईड, हेपेटायटीस, डायरिया, आमांश आणि जंतांमुळे होणारा संसर्ग यांसारख्या आजारांचा सामना करावा लागतो. अनेकदा ओटीपोटात कळ येते आणि मलाद्वारे रक्तस्राव होतो. निरोगी आहार आणि भरपूर पाणी पिणे, शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखणे याचबरोबर टायफॉइड आणि आमांशच्या उपचारांसाठी प्रतिजैविक दिली जातात.

हेही वाचा: जलसंपदामंत्री 'करेक्ट कार्यक्रमाच्या' तयारीत

लहानांना ओआरएस, डाळीचे पाणी, ताक यासारखे इतर द्रवपदार्थ देण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. सामान्य सर्दी आणि विषाणूंमुळे होणारा फ्लू हा थकवा, ताप आणि स्नांयुंमधील वेदना अशा लक्षणे दर्शविणारा असतो आणि साधारणपणे एका आठवड्यापेक्षा कमी काळ टिकतो. फ्लूने ग्रस्त असलेल्या मुलाला सूपसारखे गरम द्रवपदार्थ द्यावे आणि पुरेशी विश्रांती घ्यावी. आजारी मूल इतर मुलांच्या संपर्कात येणार नाही याची खात्री पालकांनी करून घेणे आवश्यक आहे. खोकताना किंवा शिंकताना वारंवार हात धुणे आणि तोंड आणि नाक झाकणे ही काळाची गरज आहे. वाढलेली आर्द्रता, संसर्गाची वाढ आणि वातावरणातील परागकण यामुळे मुलांमध्ये एलर्जी आणि दम्याची स्थिती निर्माण होते.

आठ महिन्यांची आकडेवारी -

  • मलेरिया - 3338

  • लेप्टोस्पायरोसिस- 133

  • डेंग्यू - 209

  • गॅस्ट्रो - 1848

  • हेपेटायटीस- 165

  • एच1एन 1 - 45

loading image
go to top