

मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपाकडून रितू तावडे यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. तर उपमहापौरपदी शिवसेनेंच्या शिंदे गटाकडून संजय घाडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी या नावांची घोषणा केली आहे. भाजप अन् शिंदेंची शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत असल्याने रितू तावडे अन् संजय घाडी यांच्या नावावर लवकरच अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे.