Drug Smuggling : अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या गजाआड

मुंबईत चोरी केलेल्या वाहनांमधून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अटक करण्यात गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांना यश आले.
drugs smuggling leader Arrested
drugs smuggling leader Arrestedesakal
Summary

मुंबईत चोरी केलेल्या वाहनांमधून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अटक करण्यात गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांना यश आले.

मुंबई - मुंबईत चोरी केलेल्या वाहनांमधून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अटक करण्यात गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांना यश आले. 38 वर्षीय आरोपीचे रईम खान असे म्होरक्या आरोपीचे नाव असून मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्ह्याची नोंद आहे. यापूर्वी त्याच्या पाच साथीदारांना गुन्हे शाखेने अटक केली होती. पोलिसांनी या सर्वांकडून एकूण 64 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

मुंबई शहरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका सराईत टोळीतील पाच आरोपीना काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखे अधिकाऱ्यांनी अटक केली होती. मात्र या टोळीचा म्होरक्या रईम खान पोलिसांना सापडत नव्हता. बुधवारी आरोपी रईम खान कुर्ला परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. अधिकाऱ्यांनी कुर्ला परिसरात सापळा रचून त्याला अटक केली. तपासात त्याच्याकडे चरस, एमडी आणि ब्राऊन शुगर हे अमली पदार्थ सापडले. तसेच वाहनांच्या अनेक बनावट चाव्याही त्याच्याकडून हस्तगत करण्यात आल्या आहे. आरोपीने अमली पदार्थ तस्करी करण्यासाठी चोरी केलेल्या वाहनांवर जप्ती करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com