Mumbai : धुक्यामुळे लोकलचे वेळापत्रक बिघडले

१० लोकल रद्द तर १०० गाड्यांना लेटमार्क !
Mumbai
Mumbaiesakal

मुंबई : मुंबई लोकलमागचे लेटलतीफीचे शुक्लकाष्ठ काही केल्या संपताना दिसत नाही. हिवाळा सुरु झाल्यावर कर्जत,कसारा, बदलापूर, खोपोली भागात पहाटे दाट धुक पसरते. या धुक्यामुळे लांब पल्लाच्या मेल, एक्सप्रेस गाड्या उशीराने धावत आहे. याचा फटका लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर पडला आहे. शुक्रवारी मध्य रेल्वेला दिवसभरात दहा लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत तर १०० लोकल गाड्यांना लेटमार्क लागला आहे.

Mumbai
Winter Tips : हिवाळ्यात 'अशी' घ्या नवजात बाळाची काळजी; दुर्लक्ष केल्यास होऊ शकतात गंभीर परिणाम

गेल्या काही दिवसंपासून थंडीचे प्रमाण वाढले असून दाट धुक्यामुळे रेल्वेची वाहतूकीला फटका बसत आहे.शुक्रवारी सकाळी मुंबई येणाऱ्या अनेक मेल- एक्सप्रेस गाड्या धुक्यामुळे आपल्या निर्धारित वेळापेक्षा १ ते २ तास विलंबाने धावत होत्या. या गाड्या उपनगरीय लोकल मार्गावर वळविण्यात आल्याने अँप जलद मार्गावरील लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले. परिणामी सकाळी १० ते १५ मिनिटे लोकल उशीराने धावत असल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच लोकल गाड्यांचा वेग मंदावल्याने लोकलचे वेळापत्रक विस्कळित होते. लोकलचे वेळापत्रक सुरळित सुरु ठेवण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने १० लोकल रद्द केल्या आहे. तर १०० पेक्षा जास्त लोकलला लेटमार्क लागला.

धुक्यामुळे रेल्वे गाड्यांचा वेगावर मर्यादा

उत्तर भारत तसेच महाराष्ट्रातील काही पट्ट्यात पहाटे मोठ्या प्रमाणात धुके असल्याने मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या लोको पायलटना रुळ, सिग्नल दिसण्यास अडचणी येतात. हवेतील दृष्यमानता कमी असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मेल-एक्सप्रेस-लोकलचा वेग कमी करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाने दिलेल्या आहेत. परिणामी मेल-एक्सप्रेस हळूहळू चालविण्यात येतात. त्यामुळे मुंबई येणाऱ्या मेल- एक्सप्रेस गाडयांना आपल्या निर्धारित वेळापेक्षा उशिराने येत असल्याने लोकल सेवनावर त्यांच्या फटका बसतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com