मुंबई : २७ तासांचा जम्बोब्लॉक काळात रेल्वेकडून वृक्षारोपण!

कर्नाक उड्डाणपूल पाडण्यासाठी मस्जिद ते सीएसएमटी दरम्यान २७ तासांचा जम्बोब्लॉक मध्य रेल्वेकडून घेण्यात येणार आहे.
मुंबई : २७ तासांचा जम्बोब्लॉक काळात रेल्वेकडून वृक्षारोपण!
Summary

कर्नाक उड्डाणपूल पाडण्यासाठी मस्जिद ते सीएसएमटी दरम्यान २७ तासांचा जम्बोब्लॉक मध्य रेल्वेकडून घेण्यात येणार आहे.

मुंबई - कर्नाक उड्डाणपूल पाडण्यासाठी मस्जिद ते सीएसएमटी दरम्यान २७ तासांचा जम्बोब्लॉक मध्य रेल्वेकडून घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक १९ ते २१ नोव्हेंबर २०२२ पर्यत कालावधी घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत रेल्वे परिसर आणि रेल्वे रुळा शेजारी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या वृक्षारोपणसाठी स्वता मुंबई विभागाचे विभागीय व्यवस्थापकसह रेल्वे कर्मचारी उपस्थित असणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचा एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि रेल्वे रूळ बाजूचा परिसर आणि स्थानकाच्या सुशोभीकरणावर मध्य रेल्वे गेल्या काही वर्षांपासून जोर देत आहे. त्यामुळे आज अनेक रेल्वे स्थानक हिरवेगार आणि पर्यावरणस्नेही दिसून येत आहे. रेल्वे प्रशासनाला रेल्वे रुळाशेजारी वृक्षारोपण करताना बऱ्याच अडचणी येत होत्या.आता मध्य रेल्वे २७ तासांचा मेगाब्लॉक कालावधीत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडी करण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे कमी पाणी लागणाऱ्या वृक्षाची रेल्वे परिसरात लागवड करण्यात येणार आहे. तसेच रेल्वे परिसरात सुद्धा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. २७ तासांचा ब्लॉकमध्ये मध्य रेल्वे मधु मालती,टीकोमा, बेहडा, हिरडा, शतावरी, भृंगराज, तुळस, आवळा, अश्वगंधा, वारपाठा, अमलतास, ग्वारपाठा, तेजपान आणि तुळशी सारख्या ५० वनस्पतींची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

स्वच्छता मोहीम -

या २७ तासांचा मेगाब्लॉकमध्ये रेल्वेकडून स्वच्छता मोहीम सुद्धा हाती घेण्यात येणार आहे. वडाळा, सीएसएमटी, कींगसर्क, मस्जिद, स्टँडहर्स्ट रोड, भायखळा, कॉटन ग्रीन, रे रोड आणि डॉकयार्ड स्थानक आणि रेल्वे रुळाशेजारी परिसरातील स्वच्छता करण्यात येणार आहे. यात मोठ्या प्रमाणात रेल्वे कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या हाऊस कीपिंग विभागाने दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com