पत्राचाळ घोटाळा प्रकरणात स्वप्ना पाटकरांची ४ तास इडीची चौकशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swapna Patkar

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात स्वप्ना पाटकर यांची मंगळवारी 23 ऑगस्टला ईडी कार्यालयात जवळपास 4 तास चौकशी झाली. चौकशीसाठी स्वप्ना पाटकर 3 वाजता ईडी कार्यालयात उपस्थित झाल्या.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात स्वप्ना पाटकरांची ४ तास इडीची चौकशी

मुंबई - पत्राचाळ घोटाळा प्रकरणात स्वप्ना पाटकर यांची मंगळवारी 23 ऑगस्टला ईडी कार्यालयात जवळपास 4 तास चौकशी झाली. चौकशीसाठी स्वप्ना पाटकर 3 वाजता ईडी कार्यालयात उपस्थित झाल्या. चौकशी झाल्यावर स्वप्ना पाटकर कार्यालया बाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलणे त्यांनी टाळले. पत्राचाळ घोटाळा आणि अलिबाग जमीन व्यवहार प्रकरणात स्वप्ना पाटकर यांची यापूर्वी सुद्धा चौकशी करण्यात आली आहे. संजय राऊत यांना इडीने 31 जुलै रोजी पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अटक केली होती. मुंबईतील विशेष न्यायालयाने सध्या त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवले आहे. संजय राऊत यांनी अलीबागच्या किहीम आणि परिसरातील १० भूखंड वर्षां राऊत यांच्या सोबत स्वप्ना पाटकर यांच्या नावे संयुक्तपणे खरेदी केल्याचे इडीने केलेल्या तपासात समोर आले आहे.

जमीन खरेदी

स्वप्ना पाटकर सुजित पाटकर यांची पत्नी आहे. सुजित पाटकर संजय राऊत यांचा जवळचा सहकारी आहे. अलिबागमधील हे भूखंड खरेदी करण्यासाठी रोख रक्कम प्रवीण राऊत यांनी दिली गेली होती असा इडीचा आरोपी आहे.अलिबागमधील जमीन खरेदी करण्यासाठी वापरलेले पैसे प्रवीण राऊत यांच्याकडून प्राप्त झाले होते. प्रवीण राऊत यानी पत्रा चाळ जमीन घोटाळ्यात एचडीआयएल या बांधकाम कंपनीकडून 112 कोटी मिळवले होते. ईडीने दावा केला आहे की ही रक्कम एकूण 1039 कोटी घोटाळ्याच्या पैशाच्या रकमेचा एक भाग होती.

ही रक्कम कथितपणे राकेश कुमार वाधवान, सारंग कुमार वाधवान आणि मेसर्स गुरुआशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे ​​प्रवीण राऊतांसोबत सर्व संचालक आणि इतरांनी जमिनीचा एफएसआय विकून कमावली होती. गोरेगावमधील पत्रा चाळ येथील 47 एकर जमीन मूळची म्हाडाची जमीन असून या भूखंडावर 672 भाडेकरू होते. याशिवाय, वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात प्रवीण राऊताकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे खात्यात लाखो रुपये हस्तांतरीत झाल्याचे आरोप आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी मनी लाँडरिंगविरोधी ईडी या वर्षी जानेवारीमध्ये वर्षाला चौकशी केली होती.

Web Title: Mumbai Ed Inquiry Of Swapna Patkar 4 Hours In Patrachawl Scam Case Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..