Mumbai Lok Sabha Constituency : मुंबईत १० आणि ११ मे दरम्यान मतदान

Voting in Mumbai : जिल्ह्यात २०० पथकांची नियुक्ती, २,७२८ जणांचे गृहमतदान
मुंबईत १० आणि ११ मे  रोजी पार पडणार मतदान
मुंबईत १० आणि ११ मे रोजी पार पडणार मतदानesakal

Mumbai Lok Sabha Election : मुंबई उपनगरातील मतदानाची तारिख जवळ येत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मुंबई उपनगरात चारही मतदारसंघात २,७२८ मतदारांनी गृहमतदानाला पसंती दिली आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील ८५ वर्षांपेक्षा अधिक आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यास अनुसरून दोन हजार ७२८ मतदारांनी गृह मतदानाचा पर्याय निवडला आहे.

मुंबईत १० आणि ११ मे  रोजी पार पडणार मतदान
Mumbai Loksabha Election : मुंबईत लोकसभा निवडणूक रिंगणात ११६ उमेदवार; आठ उमेदवारांची माघार

त्यासाठी २०० पथकांची नियुक्ती करण्यात आली असून ही पथके १० व ११ मे या कालावधीत ही प्रक्रिया पार पाडतील. तसेच दिव्यांग आणि ८५ वर्षांवरील मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्र ते मुख्य मार्गावर बेस्टच्या बसची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय आवश्यक तेथे ऑटो रिक्षांची मदत घेण्यात येणार आहे.

मतदान (Elections in India) केंद्रांवर मतदारांसाठी बूथ लेव्हल मॅनेजमेंट प्लॅन तयार करण्यात आला आहे. मतदान केंद्रांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आवश्यकता भासल्यास वैद्यकीय उपचार तातडीने मिळतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

मुंबईत १० आणि ११ मे  रोजी पार पडणार मतदान
Navi mumbai Crime: फेसबुकवरुन अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करणे शिक्षिकेला पडले महागात, 31 लाखांचा गंडा

पोलिस आयुक्त कार्यालयाच्या मदतीने मतदान केंद्रांवर पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेनंतर अधिकची पोलिस कुमक मुंबई उपनगर जिल्ह्यास मिळणार आहे. निवडणूक कामासाठी नियुक्त आणि अत्यावश्यक कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

मुंबई उपनगर (Voting in Mumbai) जिल्ह्यासाठी निवडणूक कर्तव्यावरील १६ हजार ५९६, तर अत्यावश्यक सेवेच्या कर्तव्यावरील सहा हजार ९१७ जणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यांच्यासाठी मतदार सुविधा केंद्र कार्यान्वित करण्यात येतील.

मुंबईत १० आणि ११ मे  रोजी पार पडणार मतदान
Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचणे सुलभ व्हावे, यासाठी मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अंध दिव्यांग मतदारांसाठी ब्रेल लिपीची सोय करण्यात आली आहे. ज्या दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांनी व्हीलचेअरची अथवा गृहमतदान करण्याची सूचना दिली असेल, अशा त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत,अशी माहिती मुंबई उत्तर पूर्वचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com