
Mumbai : मुंबईतील झवेरी बाजार परिसरात आग; 50 ते 60 नागरिकांचे प्राण वाचवण्यात यश
मुंबई : काळबादेवी येथील एका पाच मजली इमारतीला शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास भीषण आग लागली. मुंबादेवी मंदिराजवळ ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 1 जण जखमी झाला असून सकाळी साडे 8 च्या सुमारास आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले.
या दुर्घटनेत पराग चाकणकर यांना किरकोळ जखमा झाल्या.काळबादेवी धनजी स्ट्रीट परिसरात एका सहा मजली इमारतीला गुरुवारी मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास भीषण आग लागली. इमारतीच्या पाचव्या मजल्यापर्यंत आग पसरली होती. दुर्घटनाग्रस्त इमारतीत सुमारे 50 ते 60 रहिवासी अडकले होते
आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि इमारतीत अडकलेल्या रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. बचावकार्य सुरू असताना पहिल्या व दुसऱ्या मजल्याचा काही भाग आणि जिन्याचा भाग कोसळला. अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. पहाटे चार वाजता आग भडकल्यामुळे अग्निशमन दलाने क्रमांक तीनची वर्दी दिली. सकाळी आठ वाजता आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले.