Mumbai Fire News: मुंबईच्या काळाचौकी परिसरात आठ सिलेंडरचा मोठा स्फोट, झोपडपट्टीत मोठी आग

Mumbai Fire News: लालबाग काळाचौकी जवळील गिरनार टाॅवरच्या मागील साईबाबा झोपडपट्टीत आग लागली आहे.
Mumbai Fire News
Mumbai Fire NewsEsakal

मुंबईतील काळाचौकी परिसरातील मिंट कॉलनीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सिलेंडरचे आठ ब्लास्ट झाल्याची माहिती आहे. धुराचे लोट हवेत पसरले आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या आगीमुळे परिसरात धावपळ सुरू झाली आहे. फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.

लालबाग काळाचौकी जवळील गिरनार टाॅवरच्या मागील साईबाबा झोपडपट्टीत आग लागली आहे. एकापाठोपाठ एक सिलेंडरचे आठ ब्लास्ट झाल्याची माहिती आहे. जवळपास दिड हजार लोक या झोपडपट्टीमध्ये राहतात. महापालिकेचे आधिकारी कर्मचारी आग अटोक्यात आण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सिलेंडरच्या स्फोटामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

Mumbai Fire News
Hingoli Triple Murder : तो अपघात नव्हताच! मुलानेच केली आई-वडील अन् भावाची हत्या; कारण...

बंद असलेल्या बीएमसीच्या साईबाब पाथ स्कूल या शाळेमध्ये आग लागल्याची माहिती आहे. कोविडमध्ये या शाळेचा वापर केला गेला होता. त्यानंतर ही शाळा बंदच होती. मात्र त्या काळात वापरलेले ऑक्सिजन सिलेंडर तसेच पडून होते.

Mumbai Fire News
Manoj Jarange : मुंबईतील आंदोलनाआधीच बच्चू कडू जरांगेंच्या भेटीला; म्हणाले, सरकारने ८० टक्के काम...

आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या आगीत अद्याप कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. बचावकार्यासाठी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. सिलिंडरचा स्फोट कशामुळे झाला, याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

Mumbai Fire News
शेतकरी प्रश्नांवर संघटनांची धार बोथट! विरोधी पक्षही शांत; दुष्काळ, अवकाळीची भरपाई नाही, दूध अनुदान, पीकविम्याचीही प्रतीक्षाच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com