
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : ताडदेव येथील मासळी विक्रेत्या महिलांचे परवाने नव्याने देण्यास पालिकेने नकार दिला असून जुने परवाने हस्तांतरण करा, अशी मागणी करणारे अर्ज मच्छीमार विक्रेत्या महिलांनी केले होते; मात्र ते पालिकेने फेटाळल्याने कोळी महिलांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. याविरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी दिली.