
मुंबई : २० वर्षांपूर्वीचा तो दिवस… २६ जुलै २००५. महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या अक्षरांनी कोरला गेलेला दिवस. आभाळ फाटल्यागत (26 July Mumbai Flood 2005) कोसळणारा पाऊस, अंगावर शहारे आणणाऱ्या दरडी, पुरात वाहून जाणारी गावं, नष्ट होणारी माणसं आणि तरीही हातात हात घालून एकमेकांना वाचवणारे मुंबईकर… ही सगळी दृश्यं आजही जिवंत आहेत.