

Mumbai
esakal
मुंबई: मुंबईतील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून १३ हजार कोटी रुपयांचा एकात्मिक पूरनियंत्रण आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मुंबई आणि एमएमआर क्षेत्रावरील नियम २९३अन्वये सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी मांडलेल्या प्रस्तावाच्या चर्चेच्या उत्तरात दिली.