Robbery Case : दरोडा घालणारी सराईत टोळी गजाआड; 6 आरोपी अटकेत

पोलिसांनी दरोडा घालणा-या टोळीस बुधवारी अटक केली आहे. या टोळक्यातील 6 आरोपींना सराईत कट रचून दरोडा घालण्याच्या आरोपात अटक केली आहे.
Crime
CrimeSakal
Summary

पोलिसांनी दरोडा घालणा-या टोळीस बुधवारी अटक केली आहे. या टोळक्यातील 6 आरोपींना सराईत कट रचून दरोडा घालण्याच्या आरोपात अटक केली आहे.

मुंबई - टिळकनगर पोलिसांनी दरोडा घालणा-या टोळीस बुधवारी अटक केली आहे. या टोळक्यातील 6 आरोपींना टिळकनगर पोलिसांनी सराईत कट रचून दरोडा घालण्याच्या आरोपात अटक केली आहे. अर्शद नरूलेन खान, अरफात मोहम्मदमोर्तुझा खान, अकबर मोहमद कासीम शेख, नईम अलाउद्दीन शेख, इम्तीयाझ अब्दुल मजीद खान, अशी अटक सहा आरोपींची नावे आहेत.

25 नोव्हेंबर रोजी प्रकरणातील पिडीत फियांदी त्यांचे मित्रांसह त्यांचे संस्थेकरीता जमीन खरेदी संदर्भात राजावाडी, घाटकोपर येथून पायी चालत जात होते. तेव्हा अटक आरोपींनी कट रचुन दरोडा घालून फियादी यांचकडे असलेली 25 लाख रूपयांची रोख रोकड असलेली बॅग मारहाण करून लुटून नेली. या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

गुन्ह्याची नोंद होताच टिळकनगर पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपीची तपसाद्वारे ओळख पटवली. गुप्त बातमीदारांच्या माहितीनुसार 6 आरोपींनी अटक करण्यात आली. अटक आरोपी यांचेकडून सखोल तपास करून नमुद गुन्हयातील दरोडा घालून तुटलेली रोख रक्कम 5 लाख 23 हजार रूपये तसेच गुन्हयात वापरलेली रिक्षा व दोन दुचाकी अंदाजे किंमत 1 लाख 52 हजार रुपये असे एकूण 6 लाख 75 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळालेले आहे. गुन्हयाचा पढील तपास सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com