

मुंबईत गॅस पाइपलाइन फुटून भीषण आग लागल्याची घटना घडली. शनिवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेत काही गाड्या जळून खाक झाल्या. तर तिघे जण गंभीररित्या होरपळले. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. तिघांनाही ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेचा व्हिडीओसुद्धा समोर आलाय.