esakal | मुंबई: मोबाइल गेमवरुन भावासोबत भांडण, मुलीने उंदीर मारण्याचं औषध पिऊन संपवलं जीवन
sakal

बोलून बातमी शोधा

Rat

मोबाइल गेमवरुन भांडण, मुलीने उंदीर मारण्याचं औषध पिऊन संपवलं जीवन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मोबाइल गेम (row over mobile game) खेळण्यावरून भावासोबत वाद झाल्याने एका १६ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईत (shocking incident mumbai) समोर आली आहे. समतानगर परिसरात (samtanagar) राहणाऱ्या मुलीने उंदीर मारण्याचे औषध पिऊन आयुष्य संपवलं. शनिवारी सकाळी मुलीचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी समतानगर नगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

शुक्रवारी रात्री समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जानूपाडा भागात ही घटना घडली. मुलीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण दुसऱ्यादिवशी शनिवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी १० च्या सुमारास मुलीचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर मुलीचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला.

हेही वाचा: उत्तर कोरियाकडून घातक क्रूझ मिसाइलची टेस्ट, दक्षिण कोरिया, जपानला धोका

मुलीने शुक्रवारी रात्री ११.३० च्या सुमारास उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. मोबाइलवर गेम खेळण्यावरुन तिचा लहान भावाबरोबर वाद झाला. या छोट्याशा वादातून तिने टोकाचे पाऊल उचलले. भांडणानंतर मुलगी जवळच्या मेडीकल दुकानातून उंदरांना मारण्याचे औषध घेऊन आली व भावा समोरच ते औषध तिने प्राशन केले. भावाने लगेच कुटुंबीयांना याची माहिती दिली. कुटुंबीय तिला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. माहिती मिळाल्यानंतर पोलीसही रुग्णालयात पोहोचले. तिथे उपचार सुरु असताना मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी तपास सुरु आहे.

loading image
go to top