

Mumbai Girl Stops Police Van
esakal
Student Protest Mumbai : परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार आणि नीट (NEET) पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना एका तरुणीच्या धाडसी कृतीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. आंदोलक विद्यार्थ्यांनी भरलेली पोलीस व्हॅन अडवून विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी पुढे सरसावलेल्या रिया अहिर हिचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.