
मुंबई-गोवा महामार्गावर कारने ट्रकला धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय. या अपघातात कार कंटेनरखाली अडकल्यानं कारचा चुराडा झालाय. तर एका ३२ वर्षीय महिला डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या टेमपाळे गावच्या हद्दीत हा अपघात लाणेरे-महाड दरम्यान झाला. अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.