

Kharpada Toll
Esakal
पनवेल : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा येथे सुरू करण्यात आलेल्या टोलवसुलीच्या विरोधात जनआक्रोश समितीच्या नेतृत्वाखाली शनिवारी तीव्र आंदोलन केले. महामार्गावरील अनेक कामे अपूर्ण असताना टोलवसुली सुरू केल्याबद्दल संतप्त झालेल्या आंदोलकांनी काही काळ दोन्ही बाजूंचे टोलनाके बंद करून प्रशासनाचा निषेध नोंदविला.