
माणगाव : गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे आणि सुरत यांसारख्या शहरांमधून कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांच्या वाहनांमुळे मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. माणगावजवळ शनिवारी (ता. २३) वाहनांच्या लांब रांगा दिसून येत आहेत. यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. माणगावात येताना वाहनांच्या तीन किमी रांगा लागल्याने प्रवासी मेटाकुटीला आले होते.