मुंबई : शासकीय रुग्णालये डिसेंबर नंतर नॉन कोविड होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

covid hospital

मुंबई : शासकीय रुग्णालये डिसेंबर नंतर नॉन कोविड होणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्याने शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या ही रोडावली आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालये डिसेंबर पर्यंत कोविड रुग्णांसाठी खाटा आरक्षित राहणार असून त्यानंतर रुग्णालये नॉन कोविड केली जाणार आहेत.

कोरोना संसर्ग पसरल्यानंतर शासनाच्या जेजे,जीटी,कामा,सेंट जॉर्ज रुग्णालयात ही कोरोना रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले. सेंट जॉर्ज रुग्णालय पूर्णतः कोविड रुग्णालय करण्यात आले. या रुग्णालयांतील बाराशे पेक्षा अधिक खाटावर कोविड बाधित रुग्णांवर उपचार केले जात होते.

मुंबईतील करोना संसर्ग नियंत्रणात आहे. दररोज 200 ते 250 बाधित रुग्ण सापडत आहेत. त्यातील शासकीय रूग्णालयांत केवळ एखाद दोन रुग्ण शासकीय रुग्णालयांत दाखल होतात असे जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजित माणकेश्वर यांनी सांगितले. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने आरक्षित खाटा टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येत असल्याचे ही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: मुंबईत कोरोनाचा विळखा सैल; 94 टक्के खाटा रिकाम्या

कोविड संसर्गाच्या पहिल्या लाटेत सेंट जॉर्ज रुग्णालय डेडिकेटेड कोविड रुग्णालय करण्यात आले होते. या रुग्णालयात केवळ कोविड बाधित रुग्णांवर उपचार केले जात होते. कोविडची दुसरी लाट नियंत्रणात आल्यानंतर सेंट जॉर्ज रुग्णालय 50 % नॉन कोविड करण्यात आले. शासकीय रुग्णालयात खाटा डिसेंम्बर पर्यंत कायम राहणार असून त्यानंतर नॉन कोविड करणार असल्याचे ही माणकेश्वर यांनी सांगितले.

loading image
go to top