
मुंबई एका वृद्ध महिलेला त्वचेचा कर्करोग असून तिच्या नातवानं तिला कचऱ्यात टाकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. महिलेच्या अंगावर जखमा असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. गोरेगावच्या आरे परिसरात महिला कचऱ्यात आढळून आली. तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठीही पोलिसांना वणवण करावी लागली.