Harbour Local : हार्बरवासियांचे हाल! २० लोकल फेऱ्या रद्द, तर अनेक लोकल लेट

सलग तिसऱ्या दिवशीही मुंबई महानगरात पावसाने पुन्हा जोरदार सुरुवात केली आहे. त्यामुळे संततधारेमुळे हार्बर मार्गाच्या कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान पाणी साचले होते.
Harbour Local
Harbour Localsakal

मुंबई - सलग तिसऱ्या दिवशीही मुंबई महानगरात पावसाने पुन्हा जोरदार सुरुवात केली आहे. त्यामुळे संततधारेमुळे हार्बर मार्गाच्या कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान पाणी साचले होते. त्यामुळे डाऊन हार्बर मार्गावरील सेवा अर्धात तास ठप्प झाली होती. परिणामी हार्बर मार्गावरील २० लोकल फेऱ्या रद्द, तर अनेक लोकल सेवा विलंबाने धावत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहे.

शुक्रवारी मुंबई आणि उपनगरात सकाळी पाऊसा धारा सतत सुरु आहे. दुपारी १२. ३० वाजच्या सुमारास पावसाचा जोरा वाढला. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा धीम्या गतीने धावत होत्या.

मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यातच त्यात मुसळधार पावसामुळे हार्बर मार्गावरील कुर्ला स्थानकात पाणी तुंबल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव वडाळ्याहून मानखुर्दच्या दिशेने जाणारी डाऊन मार्गावरची वाहतूक दुपारी २.४५ मिनिटांपासून थांबवण्यात आली होती.

त्यामुळे डाऊन दिशेने जाणाऱ्या लोकल सेवा एकामागे एक खोळंबल्या होत्या. दुपारी पावसाचा जोर कमी झाला असता आणि मध्य रेल्वेच्या पंपाद्वारे पाण्याचा उपसा केला असता, दुपारी ३.१० वाजता बंद केलेली लोकल सेवा पूर्ववत केली. मात्र, या घटनेमुळे हार्बर मार्गावरील २० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या.

त्यानंतर सीएसएमटी ते वडाळा/गोरेगाव लोकल फेऱ्या २० ते ३० मिनिटे उशिराने धावत होत्या. तर बेलापूर/नेरूळ ते खारकोपर मार्गावरील आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा काही मिनिटांनी विलंबाने धावत होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com