

Virar-Dahanu local service closed
ESakal
मुंबई : बराच काळ विश्रांती घेतल्यानंतर मुंबईत पुन्हा पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. मुंबई शहरासह उपनगर जिल्ह्यांत पावसाच्या सरी कोसळत असून अनेक सखोल भाग तसेच रेल्वे रुळांवर पाणी साचत आहे. परिणामी रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम होत असून प्रवाशांसह नागरिकांचे हाल होत असल्याचे समोर आले आहे.