Mumbai Metro News : मुसळधार पावसातही मेट्रो २बची कामे प्रगतीपथावर

- मुंबई मेट्रो मार्ग २बची ५१.६३ टक्के भौतिक प्रगती पूर्ण
Metro Work
Metro Worksakal

मुंबई : मुंबईची दळण वळण व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने आणि मुंबईकरांच्या त्रासमुक्त प्रवासासाठी एमएमआरडीएमार्फत हाती घेण्यात आलेल्या मुंबई मेट्रो प्रकल्पांची कामे मुसळधार पावसातही अविरत सुरू आहेत.

डी एन नगर ते मंडाळे मेट्रो २बची कामे प्रगतीपथावर आहेत. एमएमआरडीएच्या मेट्रो टीमने चेंबूर येथील मुंबई मेट्रो मार्ग २ब च्या पॅकेज सी १०२ मध्ये पिअर कॅपची उभारणी पूर्ण केली आहे.

Metro Work
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरती प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

या मर्गिकेची कामे ३ पॅकेज मध्ये सुरू आहे. जून आणि जुलै या मान्सूनच्या महिन्यात ३३ पियर्स तसेच २३ पियर कॅप्स ची उभारणी करण्यात टीम ला यश आले आहे. आत्तापर्यंत ८३९ पैकी ४५० पियर कॅप्स ची उभारणी पूर्ण झाली आहे. सध्यस्थितीत मेट्रो मार्ग २ ब ची ५१.६३ टक्के भौतिक प्रगती पूर्ण झाली असून सर्व कामे प्रगतीपथावर आहेत.

मुसळधार पावसासारख्या आव्हानात्मक हवामानात ही मेट्रोची टीम मेट्रोची सर्व कामे उल्लेखनीय वेगाने सुरू आहेत. पायलिंग, पाइल कॅप, खांबाचे काँक्रीटीरण आणि पिअर कॅपच्या कामांदरम्यान कामगार आणि वाहतूक सुरक्षितता सुनिश्चित करत ही कामे प्रगतीपथावर आहेत.

- डॉ संजय मूखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com