
Mumbai Rain Updates: मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात पहाटेपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. परिणामी मुंबईतील अनेक सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे या वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुढील दोन ते तीन तास मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलंय.