Mumbai Rain: आनंदवार्ता! बारवी धरणात ५३ टक्के पाणीसाठा; मुंबईतील ७ धरणात किती साठा? आकडेवारी समोर

Mumbai Dam Water Level: मुंबईसह उपनगर जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत चालली असून जलपातळीबाबत आकडेवारी समोर आली आहे.
Barvi Dam water level

Barvi Dam water level

ESakal

Updated on

मुंबई : मागील चार दिवसांपासून मुंबईसह उपनगर जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशय क्षेत्रातही चांगला पाऊस पडला असून धरणातील पाणी साठ्यात वाढ होत चालली आहे. बारवी धरणात शनिवारी ५३.२४ टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला असून भातसा, तानसा, मोडक सागर, अपर वैतरणा, मध्य वैतरण आणि आंध्रा धरणातील पाणीसाठ्यातही उत्तम वाढ झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com