
मुंबईत जोरदार पाऊस सुरू झाला आहे. मुसळधार पावसामुळे शहराच्या काही भागात, विशेषतः खारमध्ये, सामान्य जनजीवन आधीच विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याची नोंद झाली आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात मागील 20 मिनिटांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसात अंधेरी पूर्वेकडील पानिपत चौकात एक झाड रिक्षावर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.