
HC Slams Police Over Illegal Arrest Directs Proper Procedure for Re Arrest
Esakal
मूकबधिर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणातील आरोपीला सोडून त्याला पुन्हा अटक करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. आरोपीला केलेली अटक बेकायदा असल्यानं त्याच्या सुटकेचे आदेश देण्यात आलेत. गुरुवारी या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. आरोपीची आधी सुटका करा आणि कायदेशीर प्रक्रिया पार पाडून त्याला पुन्हा अटक करता येऊ शकते असंही न्यायालयाने पोलिसांना सांगितले.