९० वर्षीय महिलेला दिलासा, २० वर्षे सुनावणी घेऊ नये म्हणणाऱ्या हायकोर्टानं बदलला आदेश, दिली पुढची तारीख

Mumbai High Court: अहंकाराची लढाई असल्याचे संबोधित करून प्रकरणाला २०४६ पर्यंत स्थगित करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. पण कोर्टाने दुसऱ्याच दिवशी आदेश बदलला आहे.
Mumbai High Court

Relief for Elderly Woman as Court Changes 20 Year Delay Decision

Esakal

Updated on

Bombay High Court Revises Order: एका मानहानीच्या खटल्याला आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात असलेल्या पक्षकारांमधील अहंकाराची लढाई असल्याचे संबोधित करून प्रकरणाला २०४६ पर्यंत स्थगित करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र या निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी बुधवारी (ता. २९) आदेशात बदल करून न्यायालयाने हे प्रकरण जुलैमध्ये सूचीबद्ध केले. एका ९० वर्षीय महिलेच्या याचिकेवर २० वर्षांनी सुनावणी घ्यावी, तोपर्यंत तारीख देऊ नये असं न्यायालयाने म्हटलं होतं. High Court Gives New Hearing Date After Controversial Order

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com