Crime News : बेकायदेशीर कॉल सेंटरचा क्राईम ब्रांच कडून पर्दाफाश; 6 जणांना गजाआड

मुंबईतील गोरेगावमध्ये पोलिसांच्या गुन्हे शाखेने कॉल सेंटरद्वारे फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
Crime News
Crime News esakal
Summary

मुंबईतील गोरेगावमध्ये पोलिसांच्या गुन्हे शाखेने कॉल सेंटरद्वारे फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

मुंबई - मुंबईतील गोरेगावमध्ये पोलिसांच्या गुन्हे शाखेने कॉल सेंटरद्वारे फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. बेकायदेशीररित्या कॉल सेंटरवर कारवाई करत क्राईम ब्रांचने मंगळवारी सहा जणांना अटक करण्यात आले आहे. पोलीसांनी केलेल्या कारवाईत सहा लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त केले आहे. या कॉल सेंटरद्वारे आरोपी आर्थिक फसवणूक करत असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या टोळीने पीडितांकडून सुमारे ग्राहकांची 4 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा पोलिसांनी आरोप केला आहे

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी रात्री गोरेगाव परिसरातील एसव्ही रोडवरील डीएलएच पार्कमधील कॉल सेंटरच्या कार्यालयावर छापा टाकला, आरोपी 'वन 721 ग्लोबल सर्व्हिस लिमिटेड' नावाचे कॉल सेंटर चालवत होते.

मॉरिशस आणि आखाती देशांमध्ये लोकांशी संपर्क साधत होते, त्यांना कमोडिटी ट्रेडिंगमध्ये आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास सांगायचे.आरोपी फॉरेक्स शेअर्स, करन्सी आणि कमोडिटी ट्रेडिंगमधील तज्ञ असल्याचे दाखवून सोशल नेटवर्किंग साइट्सद्वारे ग्राहकांना आमंत्रित करायचे. ग्राहकांना फायद्याचे आमिष दाखवून व्यापार सुरू करण्यासाठी त्यांच्या खात्यात 200 अमेरिकन डॉलर्स जमा करण्यास सांगायचे. असे करता करता आरोपींनी 4 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलीसांकडून कारवाईत सहा लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी माहिती दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com