mumbai : मुंबईतील तलावात पाण्याची गुणवत्ता वाढणार

पालिकेचा बायो रेमेडिएशनचा पथदर्शी प्रकल्प
 water Quality mumbai
water Quality mumbaisakal

मुंबई : महानगरपालिका क्षेत्रातील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी पालिकेने तीन ठिकाणी पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे. बायो रेमेडिएशन या प्रकल्पाच्या माध्यमातून पालिकेने सायन, कुर्ला आणि चारकोप या तीन तलावाच्या ठिकाणी ही पद्धती अवलंबण्याचे ठरविले आहे. आतापर्यंत पालिका फक्त तलावाच्या परिसरात सुशोभीकरणाचे काम करत होती. परंतु आता पालिकेकडून याठिकाणी पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठीच बायो रेमेडिएशन ही पद्धत वापरण्यात येणार आहे. पाणी शुद्ध ठेवण्यासाठी यंदा याठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठीही मज्जाव करण्यात आला आहे.

सांडपाण्यामुळे तलावातील प्रदुषणात भर पडल्याचे आढळले आहे. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे हे प्रदुषण वाढण्यासाठी आणखी कारण निर्माण होते. त्यामुळे बायो रेमेडिएशन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तसेच तलावाच्या भागात कारंजे बसवण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे पाणी शुद्धीकरणात भर पडेल. महापालिकेकडून सांडपाणी या तलावांच्या भागात जाऊ नये यासाठी उपाययोजना करण्यासाठी सल्लागारही नेमण्यात येणार आहे. या सल्लागाराकडून सांडपाणी रोखण्यासाठी उपाययोजना करणारा अहवाल वर्षभराच्या कालावधीनंतर दाखल करणे अपेक्षित आहे. याठिकाणी करण्यात आलेल्या उपाययोजनानंतर हा अहवाल तयार करून मांडण्यात येईल. या प्रकल्पाचा भाग म्हणून कुर्ला, सायन, चारकोप, कांदिवली याठिकाणच्या तलावांच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येणार आहे. या पथदर्शी प्रकल्पाच्या यशानंतरच इतर शहरातील तलावाच्या ठिकाणी हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

एन. एस. मंकीकर मार्गालगतच्या ‘सायन तलाव’ या नावाने प्रसिद्ध असणा-या तलावात दरवर्षी शीव, चुनाभट्टी इत्यादी नजिकच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने श्रीगणेश मूर्ती विसर्जनासाठी येत असतात. तथापि, तलावाची भौगोलिक वैशिष्ट्ये, परिस्थिती व तलावातील जलचर इत्यादी बाबी लक्षात घेऊन यंदाच्या गणेशोत्सवापासून या तलावात मोठ्या श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करु नये, अशी विनंती ‘एफ उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी केली होती.

यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान शीव, चुनाभट्टी इत्यादी परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी व नागरिकांनी मोठ्या श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन ‘सायन तलाव’ येथे करु नये. या तलावात केवळ घरगुती श्रीगणेश मूर्तींच्या विसर्जनाची सुविधा उपलब्ध असणार आहे. तसेच ही सुविधा रात्री १० वाजेपर्यंत असणार आहे. मोठ्या श्रीगणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी पर्यायी विसर्जन स्थळ म्हणून मोठ्या श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन हे दादर चौपाटी व माहीम रेतीबंदर येथे करावे, असेही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ उत्तर’ विभागाद्वारे कळविण्यात आले होते.

सुशोभीकरणासाठीचे काम सायन तलावाच्या ठिकाणी हाती घेण्यात आले आहे. तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केलेली विनंतीही मान्य करण्यात आली आहे. अनेकांनी याबाबतची विचारण केली होती. परंतु यंदा पालिकेच्या पर्यायी जागी विसर्जन करण्याच्या आवाहनला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

गजानन बेल्लाळे

सहाय्यक आयुक्त

एफ नॉर्थ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com