esakal | मुंबई : प्लास्टिक क्रशर सुविधा अपुरी
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबई : प्लास्टिक क्रशर सुविधा अपुरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पर्यावरण सुरक्षेसाठी आणि संवर्धनासाठी भारतीय रेल्वेकडून वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले आहेत. यामधील रेल्वेस्थानकांत प्लास्टिक क्रशर मशीन सुविधा सुरू केली होती. या सुविधेचा वेग सुरुवातीला चांगला होता.

मात्र सध्या मध्य रेल्वेच्या स्थानकांत प्लास्टिक क्रशर मशीन सुविधा अपुरी पडत आहे. मध्य रेल्वेच्या प्रमुख १८ रेल्वेस्थानकांवर ३५ बॉटल क्रश मशीन बसविण्यात येणार होत्या; परंतु कोरोना काळानंतर मशीन बसविण्याची गती कमी होऊन मध्य रेल्वेच्या ११ स्थानकांवर फक्त १४ मशीन कार्यरत असल्याचे दिसून येत आहेत. जागतिक तापमान वाढीच्या दुष्परिणामांना सामोरे जाण्याची वेळ संपूर्ण मानवजातीवर आली आहे. अनेकदा त्याचा अनुभव मानवाने घेतला आहे. त्यामुळे हरित ऊर्जानिर्मितीची गरज भासू लागली आहे. हरित ऊर्जच्या वापरासाठी जागतिक पातळीवरून मोठे प्रयत्न केले जात आहेत.

हेही वाचा: मुंबई : KEM रुग्णालयाच्या 29 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

भारतीय रेल्वे प्रशासनाकडून त्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. रेल्वेच्या एकूण विजेपैकी काही प्रमाणात ऊर्जा सौर किंवा हरित ऊर्जेच्या माध्यमातून तयार करण्याचा प्रयत्न भारतीय रेल्वेकडून सुरू करण्यात आहे. यामध्ये प्लास्टिक वस्तू बंद करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे एक्स्प्रेसमध्ये, रेल्वे स्टॉलवर आता कागदी कप दिसून येतात. यासह मध्य रेल्वेने प्लास्टिक वाटल्यांची विल्हेवाट लावण्यासाठी प्लास्टिक बॉटल क्रशर मशीन बसविल्या आहेत.

loading image
go to top