Mumbai News : वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे काश्मिरी वस्तूंचा मुंबईकरांसाठी नजराणा

'अथवास' प्रदर्शनात तब्बल १०० हून अधिक स्टॉलमधे खास काश्मिरी ओळख आणि देशभरात ख्याती असलेल्या अनेक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.
Athvas Exhibition
Athvas Exhibitionsakal
Summary

'अथवास' प्रदर्शनात तब्बल १०० हून अधिक स्टॉलमधे खास काश्मिरी ओळख आणि देशभरात ख्याती असलेल्या अनेक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.

मुंबई - काश्मीरमधील कारागिरांनी तयार केलेल्या हँडलूम व हँडीक्राफ्ट, भेटवस्तू ,प्लेट्स डबे तसेच काश्मिरी भागात मिळणारे विविध प्रकारचे मसाले आणि त्याच्या मिश्रणातून तयार केलेला केहवा हे अत्यंत रसदार पेय आदी असंख्य वस्तूंचा नजराणा काश्मीर येथील विविध संस्थांनी मुंबईकरांसाठी आणला आहे. यासाठी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या आरकेड एक्स्पोमध्ये १७ मार्चपासून 'अथवास' नावाने अनोखे प्रदर्शन भरवण्यात आले असून ते २२ मार्चपर्यंत चालणार आहे.

गुलशन फाउंडेशन द्वारा आयोजत करण्यात आलेल्या या प्रदर्शनात तब्बल १०० हून अधिक स्टॉलमधे खास काश्मिरी ओळख आणि देशभरात ख्याती असलेल्या अनेक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. येथील 40 टक्के स्टॉल मध्ये काश्मिरी कारागिरांनी केलेल्या कलाकुसर, नक्षीकाम, जरी आदी लक्ष वेधून घेणाऱ्या रंगीबेरंगी कपड्याची रास पहावयाला मिळते. यात महिला, मुलींसाठी खास कश्मिरी पेहराव आलेले कपडे, पश्मिनाच्या शाली, क्रेवल, तिल्ला, सोझनी, आरी वर्क या कलाकुसर असलेले टॉप्स, सलवार कुर्ता व साडी ठेवण्यात आली आहेत.

तर काश्मिरी ओळख असलेल्या हँडीक्राफ्ट आणि संबंधित वस्तूंची सुमारे ३५ टक्के आणि काश्मिरी चव आणि त्याचा आनंद देणारी उर्वरित ५ टक्केहून अधिक स्टॉल येथे लावण्यात आले आहेत. अनेक स्टॉलमध्ये काश्मिरी केशर आणि त्याचे अनेक प्रकार येथे उपलब्ध असून मुंबईकरांसाठी ही मोठी पर्वणी असल्याचे या प्रदर्शनाच्या आयोजकांकडून सांगण्यात आले.

Athvas Exhibition
Sanjay Raut News: "...पण माझी हरकत नाही"; हक्कभंगाच्या नोटिशीला संजय राऊतांचं उत्तर

विविध प्रकारच्या भेट वस्तू ज्यामध्ये विकर पासून तयार केलेली विविध प्रकारचे टोपल्या गृहपयोगी वस्तू ,पेपर माशीचे विविध प्रकारच्या भेटवस्तू ,प्लेट्स डबे, कालीन, इत्यादी व सर्वांच्या आवडीचे खाद्यपदार्थाचे स्टॉल्स ज्यामध्ये ड्रायफ्रूट्स कामेवा बदाम अक्रोड व त्याचबरोबर अकरा विविध मसाले वापरून तयार करण्यात आलेले केहवा हे पेय येथे येणाऱ्यांना मोठी पसंती ठरली असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com