
Mumbai Local Train: मुंबईत पुढील पाच दिवसात समुद्राला उधाण येण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. तर सध्या पावसाने उसंत घेतली आहे. दरम्यान, मध्य रेल्वेची लोकलसेवा विस्कळीत झाली असून वेळापत्रक बिघडलं आहे. ठाणे ते कल्याण वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. तर सकाळी कुर्ला सायन स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली होती. गाड्या २० ते २५ मिनिटं उशिराने धावत असल्यानं कामावर जायला निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. लोकलचं वेळापत्रक बिघडल्यानं स्थानकांमध्ये मोठी गर्दी झाली आहे.