
मुंबईतील लोकल सेवा पुन्हा ठप्प पडली आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक कोलमडल्याची दिसून आले आहे. यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. सीएसएमटीहून पनवेलकडे जाणाऱ्या लोकलच्या चाकात बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. या तांत्रिक अडचणीमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे.