Mumbai Local Attack : मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजित घटना ! धावत्या ट्रेनमध्ये तिघांनी तरुणावर केले सपासप वार

Central Railway Crime :मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावर धावत्या लोकलमध्ये तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. ही घटना ठाकुर्ली स्टेशनवर मध्यरात्री १२:१० वाजण्याच्या सुमारास घडली. दोन प्रवाशांतील वादातून तिघांनी मिळून तरुणावर सपासप वार केले.
Mumbai Local train

Mumbai Local train

esakal

Updated on

मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर झालेल्या तरुणाच्या हत्येच्या घटनेनंतर अवघ्या काही दिवसांतच मध्य रेल्वे मार्गावर एका तरुणावर धावत्या लोकलमध्ये कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे मुंबईतील रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com