ऐनवेळी लोकलने बदलला प्लॅटफॉर्म, पोहोचली एक्सप्रेसच्या प्लॅटफॉर्मवर; प्रवाशांची तारांबळ, रेल्वेचे म्हणणे काय?

Mumbai railway platform change कसाऱ्यावरून येणारी जलद लोकल नेहमीप्रमाणे उपनगरीय फलाट क्रमांक ६ वर येणे अपेक्षित असताना ती थेट मेल-एक्स्प्रेस गाड्यांसाठी राखीव असलेल्या फलाट क्रमांक ९ वर दाखल झाली.
Railway Explains Why Mumbai Local Changed Platform Suddenly

Railway Explains Why Mumbai Local Changed Platform Suddenly

Esakal

Updated on

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकावर बुधवारी दुपारी एक विचित्र प्रकार घडला. कसाऱ्यावरून येणारी जलद लोकल नेहमीप्रमाणे उपनगरीय फलाट क्रमांक ६ वर येणे अपेक्षित असताना ती थेट मेल-एक्स्प्रेस गाड्यांसाठी राखीव असलेल्या फलाट क्रमांक ९ वर दाखल झाली. या अनपेक्षित प्रकारामुळे शेकडो प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. हीच लोकल दुपारी १२.४४ वाजता सीएसएमटी-टिटवाळा जलद लोकल म्हणून सुटणार असल्याने मोठ्या संख्येने प्रवासी फलाट क्रमांक ६ वर प्रतीक्षा करीत होते. मात्र लोकल फलाट क्रमांक ९ वर आल्याचे समजताच प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com