

Mumbai Local Train Knife Attack
ESakal
मुंबई : मुंबई लोकलमध्ये दोन प्रवाशांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादात चाकू हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ पसरली आहे. या घटनेनंतर मृत तरुणाच्या कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर पसरले असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच मयंकच्या मृत्यूनंतर त्याला न्याय मिळण्यासाठी मोठी मागणी केली आहे.