
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी शनिवारी (ता.१६) रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गाच्या कामाकरिता इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग करण्यात येणार आहे. या कामासाठी शनिवारी रात्री विशेष वीज आणि वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे.