मुंबई : लोकल ट्रेनमध्ये Movies, TV shows मोफत पाहता येणार

प्रवास सुखकर होण्यासाठी रेल्वेने पुढाकार घेतला असून, ही सेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे
local
localsakal
Updated on

मुंबई : मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळख असलेल्या लोकल ट्रेनमध्ये (Mumbai Local Train) प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांचा प्रवास आता अधिक मनोरंजक होणार असून प्रवासा दरम्यान प्रवासी मोफत चित्रपट (Free Movies) आणि टीव्ही शो पाहू शकणार आहे. यासाठी रेल्वेने पुढाकार घेतला असून, मध्य रेल्वेतर्फे आजपासून लोकल ट्रेनमध्ये कंटेंट ऑन डिमांड (Content on Demand )सेवा सुरू केली आहे. ज्याचा वापर करून प्रवासी त्यांच्याकडील इंटरनेट डेटा न वापरता चित्रपट, टीव्ही शो तसेच खरेदीचा आनंद घेऊ शकणार आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व सुविधांसाठी प्रवाशांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नसून ते पूर्णपणे मोफत असणार आहे. (Free Movies & Tv Show In Mumbai Local)

local
अनेक अखिलेश इथे आहेत म्हणत बापटांनी थोपटली सोमय्यांची पाठ

या सेवेबाबत बोलताना मध्य रेल्वेचे जीएम अनिल कुमार लाहोटी म्हणाले की, नॉन फेअर रेव्हेन्यू (Non Fare Revenue) अंतर्गत ही सेवा सुरू करण्यात आली असून, या सेवेचा वापर करून प्रवाशी त्यांच्या मोबाईलवर (Mobile) चित्रपट, टीव्ही शो आणि इतर अनेक गोष्टींचा आनंद घेऊ शकणार आहेत. यामुळे रेल्वेला नॉन-फेअर रेव्हेन्यू मिळण्यास मदत होणार असल्याचे लोहोटी यांनी स्पष्ट केले.

local
Spelling Mistake : तुमची शिकवण JNU मध्ये उपयोगी पडेल

सुविधा केवळ अॅपद्वारे उपलब्ध असेल

मध्य रेल्वेतर्फे सुरू करण्यात आलेल्या या सेवेचा आनंद घेण्यासाठी प्रवाशांना प्ले स्टोअरवर जाऊन सुगर बॉक्स अॅप डाउनलोड करावे लागणार असून, अॅप डाऊनलोड केल्यानंतर मोबाईल नंबरद्वारे लॉगिन करावे लागणार आहे. लॉग इन केल्यानंतर, सुगर अॅप वाय-फायशी कनेक्ट करण्याचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर, प्रवासी चित्रपट, टीव्ही शो, खरेदीचा आनंद घेऊ शकतील, असे लाहोटी म्हणाले.

local
Corona: जगभरात चार हजारांहून अधिक भारतीयांचा मृत्यू

पहिल्या टप्प्यात एकूण 165 लोकल ट्रेनमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली असून, या सेवेसाठी 10 गाड्या सुसज्ज करण्या आल्या आहेत, तर उर्वरित गाड्या सुसज्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या सेवेच्या माध्यमातून रेल्वेला 5 वर्षांत 8 कोटी रुपयांचा नॉन-फेअर रेव्हेन्यू मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com